Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्रीपेड वीज मीटर हे महायुती सरकारचे पाप…

प्रीपेड वीज मीटर हे महायुती सरकारचे पाप…

ठाकरे शिवसेनेतर्फे लवकरच जनआंदोलन

मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा

मालवण : प्रीपेड वीज मीटरमुळे तिप्पट, चौपट विजबिले येत असून सर्वसामान्यांची लूट होत आहे. मात्र याला विरोध दर्शविणारी एकही गोष्ट सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, आमदार यांच्याकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रीपेड मीटर हे महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचे हे पाप आहे असा आरोप ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे मेतर, उपतालुका संघटक रूपा कुडाळकर, प्रसाद चव्हाण, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, दीपक देसाई, अक्षय भोसले, सुरेश मडये, नरेश हुले, रवी मिटकर, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते.

श्री. खोबरेकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनी येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर शहरातील एका नागरिकाने उपोषण केले. महावितरणने आपल्याला न विचारता, परवानगी न घेता तसेच कोणतीही तक्रार नसताना वीज मीटर बदलण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे महावितरणचे हे अधिकारी जुमानत नाहीत. सध्या फक्त सरकारी कार्यालयांमधील वीज मीटर बदलण्याचे आदेश आहेत, असे असतानाही सामान्य नागरिकांच्या घरात प्रीपेड मीटर बसवून त्यांची लूट केली जात आहे.

प्रीपेड मीटरमुळे विजेचे बिल दुपटी-तिपटीने वाढले आहे. तसेच हे मीटर बसवण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला, म्हणजेच अदानीला देण्याची गरजच काय? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला. एकीकडे सरकार 'बहिणीच्या घरात बहिणीचे पैसे' म्हणून मदत दाखवायची आणि दुसरीकडे वीज बिलाच्या माध्यमातून पैसे काढून घ्यायचे असे काम आता शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुढे करून ही लूट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.
या प्रीपेड वीज मीटर बाबत भाजप आणि शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाज उठवून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे का? असा प्रश्न खोबरेकर यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी केवळ फक्त अदानीच्या विरोधात घोषणा देऊ नका, तर हा जीआर काढणाऱ्या मंत्र्यांविरोधातही घोषणा द्यावी." भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे तर हे प्रीपेड मीटर लावण्याचा शासन निर्णय रद्द व्हावेत. हा शासन निर्णय आणि अदानीला दिलेले ठेके रद्द करण्याची धमक सरकारने दाखवावी.

अन्यथा या अन्यायाविरोधात लोकांना जागृत करण्यासाठी, शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महावितरणवर जाब विचारण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खोबरेकर यांनी दिला.

होणाऱ्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर समविचारी घटक सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

rapan bottom