Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

हडी जेष्ठ नागरिक संघाकडून ७० गुणवंतांचा गौरव

हडी जेष्ठ नागरिक संघाकडून ७० गुणवंतांचा गौरव

मालवण | प्रतिनिधी : ज्येष्ठांचे आशीर्वाद बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे आजचे होणारे तुमचे कौतुक म्हणजे आशीर्वाद आहेत. नेहमी सद्गुण अंगीकारा. अभ्यासात यश मिळवताना चांगले नागरिक सुद्धा बना. जेष्ठ नागरिक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आहे. मुलांनी स्वतः बरोबरच गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका सौ.श्रुती गोगटे यांनी केले. फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रकाश तोंडवळकर, माजी सभापती उदय परब, हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कोषाध्यक्ष श्री साळकर, संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर,भालचंद्र सुतार, प्रभाकर तोंडवळकर, प्रभाकर सुतार, मुख्याध्यापक सी.डी. जाधव, सल्लागार चंद्रकांत पाटकर, पोलीस पाटील श्रीमती पांजरी, तृप्ती हडकर, श्रीधर गोलतकर, दिनेश सुर्वे, सोनाली कदम, किशोर नरे आदी उपस्थित होते. सर्व विध्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य हडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी भेट दिल्याबद्दल संघाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. तसेच पुढील काळात अशाच सहकार्याची अपेक्षा सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी व्यक्त केली. जेष्ठ नागरिक आमच्या गावची संपत्ती आहे. त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.

यापुढेही सरपंच म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदैव ज्येष्ठांच्या पाठीशी राहू असे यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले. माजी सभापती उदय परब म्हणाले,दरवर्षी त्याच ऊर्जेने हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक राबवतात. पंचक्रोशी मध्ये मोठे काम जेष्ठ नागरिक संघ करत आहे. तुमची एकजूट अशीच कायम ठेवा. मोठा वारसा हडी गावाला लाभला आहे. यशाची कमान अशीच कायम ठेवा असे सांगितले. जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे यांनी गावातील विध्यार्थ्यांच्या मागे हा संघ यपुढेही पाठीशी राहील असे सांगितले. संघांचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांच्या मोठ्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सी. डी. जाधव, दिनेश सुर्वे, श्री साळकर,किशोर नरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष आरती कदम, सदस्य प्रभाकर चिंदरकर, रमेश कावले, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, सत्यवान सुर्वे, महादेव सुर्वे, गणू परब,अनंत घाडी, उमेश हडकर, प्रभाकर कांदळगावकर आदींसह हडी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले. फोटो : हडी येथे गुणवंत विध्यार्थी गुणगौरव करताना उपस्थित सरपंच प्रकाश तोंडवळकर, संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे, माजी सभापती उदय परब, सौ श्रुती गोगटे, चंद्रकांत पाटकर व अन्य

rapan bottom