Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चौके | श्रीमती वेदवती गावडे आणि सौ. हर्षदा गावडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

चौके | श्रीमती वेदवती गावडे आणि सौ. हर्षदा गावडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

मालवण : चौके ग्रामपंचायतच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी श्रीमती वेदवती गावडे आणि सौ. हर्षदा गावडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडील आदेशानुसार गावामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा असे कळविण्यात आले होते. त्यानुसार चौके मांडखोलवाडी येथील श्रीमती वेदवती लक्ष्मण गावडे या चौके ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून तसेच चौके वावळ्याचे भरड येथील बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असलेल्या सौ. हर्षदा हरिश्चंद्र गावडे यांची निवड करण्यात आली. त्यांना स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सरपंच श्री. पी. के. चौकेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी श्री. शिंगरे, महसूल अधिकारी श्री. गुरव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर ,सामाजिक कार्यकर्ते श्री बिजेंद्र गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नितीन गावडे, पत्रकार संतोष गावडे व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून पूरस्काराबाबत माहिती दिली.

सामाजिक जाणीवेतून आज ग्रामीण भागातील महिला पुढे येत आहेत ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे . स्वातंत्र्य दिनी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान करायला मिळाला आनंददायी बाब आहे. या कार्यक्रमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन सरपंच श्री. चौकेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला चौके पोलीस पाटील श्री रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर सौ. जयश्री कदम, सौ. अक्षता गायकवाड सेवानिवृत्त शिक्षक विजय चौकेकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुनुरे, आरोग्य केंद्राच्या डॉ. चैताली ढोले, महा-ई-सेवा केंद्राचे श्री. भगत, श्री. विनायक गावडे, श्री मयूर गावडे, श्री महेश सावंत, श्री मोहन गावडे, अंगणवाडी सेविका भारती सुकाळी, श्रीमती सुहासिनी परब, आशा स्वयंसेविका सौ. सिद्धाली गावडे, सौ. अनिता चौकेकर, श्रीमती नीरा सावंत, स्वप्नील चौकेकर, बचत गटाच्या प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत लिपिक सौ. सुविधा गावडे यांनी आभार मानले.

rapan bottom