स्वातंत्र्य दिन निमित्ताने शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांचा उपक्रम
मालवण : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्ताने शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या वतीने मालवण शहरातील जिप प्राथमिक शाळा रेवताळे व जिप प्राथमिक शाळा देऊळवाडा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी जगदीश गांवकर, बाळू नाटेकर, राजू बिदये, राजन परुळेकर, अरुण तोडणकर, बाबू वायंगणकर, महेश सारंग, आबा शिर्सेकर, दत्ता केळूसकर, शिवाजी केळूसकर, प्रमोद डिचोलकर, निनाद बादेकर, समीर माडये, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर, विलास मुणगेकर, मुन्ना फाटक, बाप्पा फाटक यांसह अन्य उपस्थित होते.

