Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

माझे आमदार पद जनतेच्या सेवेसाठीच : आ. निलेश राणे

माझे आमदार पद जनतेच्या सेवेसाठीच : आ. निलेश राणे

श्रावणधारा महोत्सवात घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री देवी घुमडाई मंदिरात आमदार निलेश राणे यांचा सत्कार

जनतेचे आशीर्वाद आणि दत्ता सामंत यांची भक्कम साथ यामुळेच आमदार झालो

लवकरच दत्ता सामंत ही आमदार होतील : आ. निलेश राणे



मालवण : जनतेच्या आशीर्वादाने आमदार म्हणून विजयी झालो. माझे आमदार पद हे जनतेच्या सेवेसाठी आहे. जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवणे. गावागावात अधिकाधिक विकासनिधी आणणे. हेच लक्ष आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी घुमडे येथील श्री देवी घुमाडाई मंदिर येथे बोलताना केले.

दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची भक्कम साथ लाभली. माझ्या विजयात त्यांचाही मोठा सहभाग आहे. सोबतच जिल्हाप्रमुख म्हणून ते सर्वाधिक यशस्वी ठरत आहेत. अनेक पक्षप्रवेश होत आहेत. शिवसेना मजबूत होत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून अग्रक्रमात असलेले दत्ता सामंत लवकरच आमदार होतील. असाही विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.



श्रावणधारा महोत्सव अंतर्गत घुमडे येथील घुमडाई मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. गुरुवारी मंदिरात लघुरुद्र करण्यात आला. तर संयुक्त दशावतार यांचा 'कालचक्र' दशावतार नाट्यप्रयोग रात्री उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निलेश राणे देवी घुमाडाई मंदिरात आले असता शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व ग्रामस्थांनी निलेश राणे आमदार होऊदेत असे साकडे देवी चरणी घातले होते. त्याची नवसफेड दत्ता सामंत यांनी गुरुवारी केली. आमदार निलेश राणे यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी घुमडे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.



यावेळी उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहर प्रमुख दिपक पाटकर, संघटक राजू बिडये, शहर सचिव महेश सारंग, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, बाबू बिरमोळे, दिलीप बिरमोळे, भाऊ सामंत, उमेश बिरमोळे, सरपंच स्नेहल बिरमोळे, कुसुम सामंत, वनिता साळसकर, नीलकमल बिरमोळे, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, जिल्हा संघटक अंजना सामंत, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, स्नेहा राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सुशांत घाडीगावकर, निलेश बाईत, प्रशांत परब, मंगेश यादव, मसुरे माजी उपसरपंच पिंट्या गांवकर, बाबू आंगणे, दिनेश आंगणे, मंदार लुडबे, सुरज बिरमोळे, शानू वालावलकर यांसह घुमडे ग्रामस्थ मंडळ सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. राजा सामंत यांनी उत्स्फूर्त सूत्रसंचलन केले.



यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, गेल्या वर्षी घुमडाई देवीकडे साकडे घेतले होते निलेश राणे आमदार होऊदेत. देवीने साकडे पुर्ण केले. आज लोकप्रिय आमदार म्हणून निलेश राणे यशस्वी काम करतं आहेत. सभागृहात अभ्यासू पणे प्रश्न मांडत आहेत. मोठा निधी आणत आहेत. 288 आमदार मध्ये ते यशस्वी ठरत आहेत. दहा वर्षात झाले नाही तेवढे बंधारे आमदार निलेश राणे यांनी मंजूर केले. हजार कोटी निधी आला. व्हिजन असलेले नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे. दशावतार कलाकार यांना राजश्रय मिळवून देण्यात त्यांची भुमिका महत्वाची ठरत आहेत. मालवण कुडाळ अग्रेसर पणे वाटचाल करतं आहे. असे दत्ता सामंत म्हणाले..

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom