आमदार निलेश राणे यांची सायंकाळी प्रमुख उपस्थिती
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण : घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिर येथे संयुक्त दशावतार यांचा 'कालचक्र' दशावतार नाट्यप्रयोग सायंकाळी 7 वा. संपन्न होणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित देवी चरणी नवसफेड होणार आहे.
सकाळी मंदिरात लघुरुद्र तर दुपारी महाप्रसाद संपन्न होत आहे. घुमडे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने श्रावणधारा महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न होत असून मंगळवारी भजन सादरीकरण तसेच गुरुवारी दशावतार संपन्न होत आहेत. या सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

