Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भाजपा पक्षप्रवेश | उबाठा कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

भाजपा पक्षप्रवेश | उबाठा कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

भाजपा उपाध्यक्ष केदार झाड यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश

भाजपाची वायरी-भुतनाथ जिप विभाग बैठक संपन्न

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांसह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती

मालवण : आमचे नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात वायरी भूतनाथ मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. तुमच्या कोणत्याही समस्या असतील, तर भारतीय जनता पक्ष नेहमीच तुमच्यासोबत असेल. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वांचा भाजपात सन्मान ठेवला जाईल. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी वायरी भूतनाथ येथे बोलताना केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भारतीय जनता पक्षाने आता स्थानिक निवडणुका लक्षात घेता स्थानिक स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. याच अनुषंगाने वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शाम झाड आणि मनोज झाड यांची बूथ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राणे साहेबांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात मी स्वतः १९९२ पासून राजकारणात सक्रियपणे काम करत आहे. आगामी काळातही भाजपा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले. या बैठकीत बोलताना अनेक मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे स्वागत केले तसेच मार्गदर्शन केले.

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. आज आपण पाहतोय, भाजप विकास आणि रोजगारासाठी कार्यरत आहे. अनेक विकासात्मक प्रकल्प आणि कामे सुरू आहेत, तर काही लवकरच सुरू होतील. भाजप तळागाळात काम करत असल्यामुळेच लोकसभा आणि विधानसभेत यश संपादन करू शकलो. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मी स्वागत करतो.असे ते म्हणाले.

शहर अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच मागील निवडणुकांमध्ये वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदारसंघात तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले. येत्या काळात युवा आणि महिला मोर्चावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. मागील काळात येथील अनेक समस्या भाजपने सोडवल्याचेही त्यांनी नमूद केले.

महेश मांजरेकर यांनी नवनियुक्त बूथ अध्यक्षांना मार्गदर्शन केले. पक्षाचे काम जनतेपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवता येईल, यावर त्यांनी भर दिला. आपल्या बूथमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बूथ अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीला भाजपा उपाध्यक्ष केदार झाड, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक पंकज सादये, देवानंद लोकेगावकर, रवींद्र खानविलकर, संदीप बोडवे, सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, पूजा झाड, मिलिंद झाड, शाम झाड, मनोज झाड यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी समीर पाटकर, लिलाधर झाड, जगदीश वेंगुर्लेकर, चिन्मय आचरेकर, मंदार झाड, हेमंत वस्त, यतीन मालवणकर, विनोद नांदोसकर, मुकेश आचरेकर, संजय वस्त, सुशांत सुर्वे, सुनील वेंगुर्लेकर, दीपेश नांदोसकर, मैथिली टिकम, शुभम चिंदरकर, अमित पालकर, निखिल साळवी, चंद्रकांत पाटील यांसह अनेक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या बैठकीमुळे वायरी भूतनाथ मतदारसंघात भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात पक्ष आणखी जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom