Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कालावल खाडीपात्रातील अवैध उपशाची वाळू विनापरवाना वाहतुक केल्याप्रकरणी अटकेतील डंपर चालकांना जामीन मंजूर

कालावल खाडीपात्रातील अवैध उपशाची वाळू विनापरवाना वाहतुक केल्याप्रकरणी अटकेतील डंपर चालकांना जामीन मंजूर

संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

आचरा : कालावल खाडी येथे अवैध उपसा केलेली वाळू विनापरवाना वाहतुक प्रकरणात पकडलेले संशयीत डंपर चालक दत्तराज राजन बोडेकर (वय 26) रा. साटेली भेडशी ता. दोडामार्ग, विठ्ठल पांडाप्पा राठोड, (वय 27) रा. गुढीपूर पिंगुळी ता. कुडाळ आणि गुंडप्पा नंदाप्पा राठोड (वय 32) रा. सांगिर्डेवाडी, कुडाळ यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

9 ऑगस्ट 2025 रोजी 4. 40 वाजता मे. मसुरे मंडळ अधिकारी यांनी बांदिवडे मळावाडी येथे केलेल्या कारवाईत दत्तराज राजन बोडेकर, विठ्ठल पांडाप्पा राठोड, गुंडप्पा नंदाप्पा राठोड हे संशयीत त्यांचे ताब्यातील डंपर मधून वाळू वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर सदर डंपर ताब्यात घेऊन संबंधित डंपर चालकांवर आचरा पोलिस ठाण्यात 10 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार नोंद करण्यात आली. त्यानंतर आचरा पोलिसांनी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 303(2), 3(5) अन्वये गु.र. नं. 41/2025 नोंद केला. त्यानुसार केलेल्या पोलिस कारवाईत संशयीत डंपर चालकांना पोलिसांनी दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी अटक करून ताब्यात घेतले होते.

प्राथमिक तपासकाम व गुन्ह्यामधील वाहने व वाळू रितसर जप्त करून सर्व अटक संशयीतांना पोलिसांनी मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात त्याच दिवशी हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता मालवण पोलिसानी सर्व संशयितांची 3 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली होती. मात्र आवश्यक रिकव्हरी पूर्ण झाली असल्याने व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव मे. न्यायालयाने पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून संशयीताना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर संशयीतांतर्फे केलेल्या जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.

rapan bottom