Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात 'शिवसेना' जनतेच्या मनामनात पोहोचवणार!

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात 'शिवसेना' जनतेच्या मनामनात पोहोचवणार!

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रतिपादन

शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना वेताळ बांबर्डे विभाग बैठक उत्साहात संपन्न

निवजे येथील उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम यांचा शिवसेनेत प्रवेश

शानू वालावलकर | कुडाळ : शिवसेना पक्षाच्या नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीनंतर प्रथमच कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे जि प विभागातील बैठक शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हिर्लोक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. विभाग प्रमुख नागेश आईर आणि अनंत सावंत यांनी उपस्थिती मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येणाऱ्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यादृष्टीने आपल्या पक्षाची मांडणी अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागू या असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, खासदार नारायण राणे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथर शिंदे साहेब तसेच आमदार निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण मध्ये शिवसेना पक्ष राज्यात एक नंबर वर नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आमदार निलेश राणे आता राज्यातील आमदारांमध्ये प्रभावी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या विधानसभेतील अभ्यासपूर्ण आणि आवेशपूर्ण भाषणांनी सर्व जनता त्यांचे कौतुक करत आहेत.

येणाऱ्या कालावधीत कुडाळ मालवण मधील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता वेळप्रसंगी स्वखर्चाने देखील कामे करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपनेते संजय आंग्रे यांनी देखील मार्गदर्शन करून येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचून लोकांची विचारपूस करावी व आमदार साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणारे भेटवस्तू नियोजनबद्ध आपल्या गावामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करावी असे आवाहन केले.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख सौ. दीप्ती पडते यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करून मुख्य संघटनेबरोबर महिलांनी देखील आता सक्रियपणे पक्षाच्या कामांमध्ये पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण असून त्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी एक दिलाने पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे व येणाऱ्या कालावधीत आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील मतदारसंघ साकारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी विभाग प्रमुख नागेश आईर यांनी विभागातील पक्षाच्या कामाचा आढावा सादर केला.

निवजे येथील उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.लक्ष्मण कदम यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला…

यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दीप्ती पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, युवासेना तालुका प्रमुख अनिकेत तेंडुलकर, उप तालुका प्रमुख देवेंद्र नाईक, युवा सेने उपजिल्हा प्रमुख स्वरुप वाळके, विठ्ठल शिंदे, प्रविण मर्गज तालुका समनव्यक, अनुप्रीती खोचरे, महिला सेना जिल्हा कार्य सदस्य, सौ.दीक्षा सावंत महिला सेना तालुका संघटक, वैश्णवी शिंदे, महिला सेना उप तालुका प्रमुख, सौ.नूतन आईर महिला सेना तालुका सचिव, सौ.रेवती राणे महिला सेना तालुका सचिव, सौ. सौरवी चव्हाण महिला सेना विभाग प्रमुख, शितल वर्दम महिला सेना कुडाळ शहर प्रमुख, वैशाली पावसकर सरपंच पावशी, अमित तावडे, अनंत सावंत, भास्कर गावडे उपविभाग प्रमुख, आना भोगले, रचना नेरुरकर, साजुराम नाईक, अरुण आचरेकर, प्रकाश पावसकर, सुधाकर सावंत, विजय जाधव सिताराम चव्हाण, सचिन पालव, आबा कुनकेरकर, बबन शिदें, अनंत सावंत, चद्रकांत सावंत, प्रकाश सावंत, अनुराधा सावंत, सज्जन सावंत, स्नेहल सावंत, दिपाली कानसे, अकिता सावंत, रोहीनी चव्हाण अवधूत सामंत, सुरेश झोरे, संजय सावंत, सचिन साईल आदी उपस्थित होते.

यावेळी वेताळ बांबर्डे विभागातील सर्व गावातील शाखा प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये निलेश बांबर्डेकर वेताळ बांबर्डे, सुनिल गायकवाड वेताळ बांबर्डे, सुभाष तुळसकर रा. तुळसुली, रविंद्र देसाई नारूर, नारायण आचरेकर कुसगाव, मनोरंजन सावंत आवळेगाव, रामचंद्र सावंत टेमगाव, चेतन मोरजकर कडावल, अमोल मर्गज पांग्रड, विजय सावंत किनळोस, सुशिल तांबे गिरगाव याना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

rapan bottom