मालवण तालुक्यातील बीएसएनएल सेवेतील समस्या सोडवण्याबाबत चर्चा
युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : युवासेना पदाधिकाऱ्यांनी मालवण येथील बीएसएनएल कार्यालयाला भेट देऊन बंद स्थितीतील टॉवर तसेच रेंज समस्या बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या दूर करा. टॉवर सुस्थितीत करून सेवा सुरळीत करा अशी भुमिका मांडली.
सावंतवाडी येथील बीएसएनएल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ही यावेळी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुका प्रमुख अभी लाड, वेरळ सरपंच धनंजय परब, महान सरपंच अक्षय तावडे, भाऊ राऊत, योगेश परब, उमेश सावंत आदी युवासेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात काम करत असताना त्यांच्या शिकवणीप्रमाणे जनतेचे प्रश्न जाणून ते सोडवून देणे हे पाहिले कर्तव्य असले पाहिजे. त्यानुसार काम करत असताना बीएसएनएल सेवेबाबत नागरिकांचे प्रश्न, समस्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना सांगितल्या. खासदार नारायण राणे साहेब, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक टॉवर मंजूर झाले. या माध्यमातून जनतेपर्यत सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असताना काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या दुरु करून सोडवल्या जाव्यात याबाबत लक्ष वेधण्यात आले. दरम्यान ज्या ठिकाणी समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अशी माहिती संग्राम साळसकर यांनी दिली.
- अमित खोत, मालवण

