मालवण : साहिल अनिल साठे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (क्लास वन गँझेटेड अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. मालवणसाठी गौरवास्पद असाच हा क्षण आहे. कोकण सागरी सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल साठे आणि भरड येथील फॅशन गॅलरीच्या सर्वेसर्वा सौ. शीतल साठे यांचा साहिल हा मुलगा आहे. साहिल यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन परीक्षेत घवघवीत यश मिळवत साहिल यांनी हे यश प्राप्त केले आहे. आता भारतीय नौदलात 'कमिशनंड ऑफिसर' म्हणून देशाची सेवा करणार आहेत.

साहिल यांनी आपले पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथील वाडिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (BE) पदवी संपादन केली.

कोकण सागरी सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल साठे आणि भरड येथील फॅशन गॅलरीच्या सर्वेसर्वा सौ. शीतल साठे यांचा साहिल हा मुलगा आहे. साहिल यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून मालवण साठीही हा गौरवाचा क्षण आहे.
▪️ अमित खोत | मालवण

