शिवसेना मालवण महिला आघाडीचा उपक्रम

शानू वालावलकर | मालवण : लाडक्या बहिणींना दर महिन्याला ओवाळणी देणारे आमचे शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासाठी रक्षाबंधन उपक्रम मालवण शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते यांचा नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात राबवण्यात आला. तालुक्यातील अनेक लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांना आभार पत्रे दिली.

मालवण तालुक्यातील गावा गावात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा साठी लाडक्या बहिणीनी शिवसेना महिला आघाडीचा माध्यमातून एकत्र येत लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबाना आभार पत्र देण्यात आली. यावेळी महिला तालूका प्रमुख मधुरा तुळसकर, जिल्हा सहसचिव कविता मोंडकर, उपतालुका प्रमुख प्रियांका मेस्त्री,
क्रांती धुरी, लुद्दीन फर्नांडिस, ज्योती तोडणकर उपस्थित होते.

