आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र
शहरप्रमुख दीपक पाटकर यांची माहिती

मालवण : शिवसेना मालवण शहर विस्तृत कार्यकारणी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी जाहीर केली आहे. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी
यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, शहर उप तालुकाप्रमुख अरुण तोडणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना मालवण शहर कार्यकारणी
शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या नेतृत्वात मालवण शहर संघटक राजू बिडये, शहर समन्वयक सहदेव बापार्डेकर, उपशहरप्रमुख जगदीश गांवकर, अभय कदम, राजन परुळेकर, दत्तात्रय केळूसकर, कमलेश कोचरेकर, शहर सचिव महेश सारंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण शिर्सेकर, सहसचिव सुरेंद्र फाटक यांसह शाखाप्रमुखपदी विलास मुणगेकर, साईनाथ बांबूळकर, रामचंद्र पराडकर, निलेश लुडबे, प्रमोद मराळ, नरेश कोयंडे, दिगंबर पाटील, जेम्स डायस, जगदीश वालावलकर, रणजित खांदारे, सागर पाटकर, वैभव तोंडवळकर, जॉन्सन फर्नांडिस, सूर्यकांत राजापूरकर, संदीप
मालंडकर, शिवाजी केळूसकर, गणेश परब, संतोष इब्रामपूरकर, बाबू वायंगणकर आदी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांनी सर्व बंधारे मंजूर केले ; दत्ता सामंत
निलेश राणे आमदार झाल्या नंतर विकास कामांचा धडाका लावला आहे. देवबाग ते आचरा किनारपट्टी भागात सागरी अतिक्रमण बाधित सर्वच ठिकाणी नागरिकांना सुरक्षिता मिळाली पाहिजे. या दृष्टीने सर्व बंधारे मंजूर करून घेतले. सुमारे 250 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला. रस्ते विकासासाठीही मोठा निधी मंजूर करून घेतला आहे. पावसाळ्यानंतर बहुतांश सर्व रस्ते मार्गी लागतील. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या सर्वच क्षेत्रात आमदार निलेश राणे यांची कामगारी प्रभावी ठरली आहे. सभागृहात अभ्यासू नेतृत्व जनता अनुभवत आहे. आमदार निलेश राणे म्हणजे मालवण कुडाळचा अभिमान आहेत. अश्या भावना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

दत्ता सामंत यांच्या कामाचे विशेष कौतुक
शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असे काम शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत करत आहेत. तात्काळ रिजल्ट म्हणजे दत्ता सामंत असे समीकरण बनले आहे. अनेक पक्षप्रवेश होत आहेत. आपली शिवसेना जोमाने वाढत आहे. असे आमदार निलेश राणे म्हणाले.
शिवसैनिक हेच मोठे पद : आ. निलेश राणे
शिवसेना हे एक कुटुंब आहे. प्रत्येकाने शिवसैनिक हेच पद मानून काम करा. मी पण आमदार नंतर आधी शिवसैनिक. शिवसेनेच्या शिकवणी प्रमाणे प्रत्येक पदाधिकारी यांनी जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या. आपल्या वागणूकितून शिवसेनेची छबी उमटली पाहिजे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक प्रभागात जोमाने काम करा. महायुती सरकार माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणण्याची जबाबदारी माझी. निधी कमी पडणार नाही. बंधारे, रस्ते या सोबत 54 कोटी निधी नगरोत्थान माध्यमातून नगरपरिषदला प्राप्त झाला आहे. कोकणावर शिंदे साहेबांचे विशेष प्रेम आहे. त्यांना अपेक्षित संघटना बनवूया. असे आमदार निलेश राणे म्हणाले.
▪️अमित खोत, मालवण

