वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अणाव जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू सुपूर्द
मालवण : कै. विलास सुरबा गावडे यांच्या नवव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुलगा प्रितम गावडे यांनी अणाव येथील जीवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.

यावेळी प्रितम यांच्या आई प्रणाली गावडे, पत्नी सौ. वैष्णवी तसेच प्रतीक गावडे, ओंकार चव्हाण उपस्थित होते.
वडिलांचा उद्योग व्यावसाय सांभाळत अल्पावधित प्रितम गावडे यांनी उद्योग व्यावसाय व राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. मात्र नेहमीच सामाजिक जाणीवेतून त्यांचे सातत्याने समाजकार्य आईच्या मार्गदर्शनाखाली सुरु असते.

