युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभि लाड यांनी वेधले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष
काम सुरु झाल्याने मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : आचरा कणकवली मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. याबाबत युवासेना मालवण तालूकाप्रमुख अभि लाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आचरा बंदर ते कणकवली जाणारा राज्यमार्ग आचरा सीमंबा, चिंदर बाजारपेठ, पळसंब पूल या ठिकाणावर पडलेले मोठं मोठे खड्डे वाहतुकीसं अत्यंत धोकादायक ठरत आहेत, त्यामुळं अपघातांची भीती तसेच वाहनांचं नुकसान होत आहे. खड्डा चुकवताना होणारे अपघात, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांना प्रवास करताना होणार त्रास लक्षात घेता वेळीच हे खड्डे बुजविणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी. अशी मागणी युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभि लाड यांनी केली होती. आता काम सुरु झाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. जनहिताला सर्वाधिक प्राधान्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास हेच लक्ष आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात आम्ही युवासेना जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध आहोत. असे अभि लाड यांनी सांगितले.

