बंड्या सरमळकर मित्रमंडळ पुरस्कृत व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजन
लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धाही आयोजित
मालवण : नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका व महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित व बंड्या सरमळकर मित्रमंडळ पुरस्कृत महिलांसाठी खुली नारळ लढवणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण नवीन बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे.
याचवेळी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धाही आयोजित केली आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी नीना मुंबरकर व भाग्यश्री लाकडे - खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी महिला आघाडीच्या तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेथर, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे- खान, उपतालुकाप्रमुख नीना मुंबरकर, युवती उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, लक्ष्मी पेडणेकर, राधिका मोंडकर, मंदा जोशी, सोनाली डिचवलकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील पारितोषिक
स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी, तृतीय पारितोषिक मिक्सर व पैठणी, चतुर्थ पारितोषिक टॉवर फॅन व पैठणी यासह इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच लकी ड्रॉ ठेवण्यात आला असून त्यामध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वेशभूषा स्पर्धा
१२ वर्षाखालील मुले-मुलींसाठी
वेशभूषा स्पर्धा नारळी पौर्णिमा (कोळी) या संकल्पनेवर होणार आहे. तसेच खास आकर्षण म्हणून सुरेल बँजे पार्टी यांचे वादन होणार आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर तसेच ऍड. उल्हास कुलकर्णी, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती यावेळी नीना मुंबरकर व भाग्यश्री लाकडे - खान यांनी दिली.
अधिक माहितीसाठी भाग्यश्री लाकडे ९२०९१४५९३९, विद्या फर्नांडीस, नीना मुंबरकर, रुपा कुडाळकर, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

