मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव
मालवण | प्रतिनिधी : शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते. किल्ले सिंधुदुर्ग वरून दर्याला मानाचे सुवर्ण श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवण बंदरजेटी येथे शहरातील मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक सागराला श्रीफळ अर्पण करतात. मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने येतात. श्रीफळ पूजन होते. या सोहळ्यात सहभागी होत आमदार निलेश राणे सागराला श्रीफळ अर्पण करणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचीही उपस्थिती यावेळी असणार आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी दिली.
दरम्यान, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे जिलेबी आणि सामोसा वाटप शिवसेनेच्या वतीने नागरिकांना केले जाणार आहे.
तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी यावेळी उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मच्छिमार, व्यापारी बांधवांसोबत आमदार निलेश राणे सागराला श्रीफळ अर्पण करणार
