Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भाजपाने वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष!

भाजपाने वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष!

स्मार्ट मिटर, सरासरी लाईटबिल व अन्य वीजप्रश्नी बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर यांनी मांडली भुमिका

उच्च दाब वीज प्रवाहामुळे नगरिकांच्या नुकसानीचा उपस्थित केला प्रश्न

मालवण | प्रतिनिधी : स्मार्ट मिटर, सरासरी लाईटबिल, उच्च दाबाच्या वीज प्रवाहमुळे वीज ग्राहकांचे होणारे नुकसान व अन्य वीजप्रश्नी भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भुमिका मांडली. वीज समस्या वेळेत सोडावा, गणेश चतुर्थी पूर्वी सर्व कामे पुर्ण करा. आगामी काळात वीज पुरवठा सुरळीत राहील. पुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने नियोजन करा. अश्या सूचना देण्यात आल्या.

महायुती सरकार माध्यमातून मोठा निधी प्राप्त होत आहे. अनेक विकासकामे सुरु आहेत. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार वीज विभागाने प्राधान्याने कुडाळ मालवण वीज समस्या सोडवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी वीज विभागाने कार्यरत राहावे. असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले

जुने मिटर सुस्थितीत असतील तर स्मार्ट मिटर सक्ती ग्राहकांवर करू नका. त्याच प्रमाणे वीज बिल आकरणी करताना कुलूप फोटो दाखवून सरसरी वीज बिल येणार नाही याची दक्षता घ्या. दांडी भागात उच्च दाब (440) विजमुळे ग्राहकांचे वीज उपकरणे यांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी पूर्वी माजी खासदार राऊत, माजी आमदार नाईक यांच्या काळात चुकीचे वीज वाहिन्या जोडणी झाल्यामुळे हे प्रकार होत असल्याचे सुदेश आचरेकर म्हणाले.

गणेशोत्सव लक्षात घेता आतापासून सुरळीत वीज पुरवठा राहिला पाहिजे. बाजारपेठ गणेश चित्रशाळा यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. असेही सुदेश आचरेकर बाबा मोंडकर यांनी सांगितले.

यावेळी भाजपा पदाधिकारी माजी नगरसेविका पुजा करलकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, जिवन भोगावकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, सुरेश बापार्डेकर, संमेश परब, मालवणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom