एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील बांधवांसाठी…
कुडाळ : 'एक राखी सैनिकांसाठी सीमेवरील बांधवांसाठी'! या भावनिक व सामाजिक उपक्रमातून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते व कुडाळ शिवसेना पदाधिकारी यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या बांधवाना रक्षाबंधन निमित्त पोष्टाच्या माध्यमातून राखी पाठवल्या.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नैना मांजरेकर, उपतालुकाप्रमुख वैष्णवी शिंदे, तालुका सचिव रेवती राणे, तालुका सचिव नूतन आईर, कुडाळ शहरप्रमुख रेवती राणे, तालुका समन्वयक दिक्षा सावंत, अनुरीती खोचरे, मृणाल परब, शुभांगी चव्हाण, दिक्षा आकेरकर, रचना नेरुरकर, संगीता खांडेकर, गौतमी कासकर, वैशाली पावसकर आदी उपस्थित होते.

