Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय UDID शिबिर संपन्न

विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी मालवण तालुकास्तरीय UDID शिबिर संपन्न

मालवण : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला पाच वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, 'अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) २०२५' अंतर्गत पंचायत समिती मालवण शिक्षण विभाग आणि RBSK ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय UDID (Unique Disability ID) शिबिर आयोजित करण्यात आले.

​या शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना UDID कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले UDID कार्ड मिळण्यास मदत झाली आहे.

​यावेळी मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी संजय माने, विषय तज्ज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळी, ममता जोगल, विशेष तज्ज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे, विशेष शिक्षक नितीन पाटील, महेश चव्हाण, हनुमंत तावडे, वरिष्ठ सहाय्यक वैभव वाघाटे व इतर कर्मचारी अजिंक्य चोडणकर, प्रणय साटम, RBSK ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक कागदपत्रे जमा केली. शिबिरात विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या उपक्रमामुळे विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर क्षेत्रांतही प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

rapan bottom