Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

१९९० पासून शिरवंडे गाव राणे साहेबांसोबत एकनिष्ठ : शिवसेना शाखा प्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर

१९९० पासून शिरवंडे गाव राणे साहेबांसोबत एकनिष्ठ : शिवसेना शाखा प्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर

रघु गांवकरला बोलते करणाऱ्या तालुक्यातील पडद्यामागच्या बोलावत्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत

रघु गांवकर यांनी निष्ठेचा खोटा दिखावा करून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये

मालवण : सोमवार दिनाक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या शिरवंडे येथील रघु गांवकर यांनी सदिच्छ भेट घेतली. एका धार्मिक विषयात ही भेट होती. सामाजिक विषयातील ही भेट असल्याने त्या भेटीची छायाचित्र सोशल मीडियात प्रसारित झाली. भेट सामाजिक धार्मिक विषयावर आल्याने प्रसारित झालेल्या फोटोवर आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते. मात्र रघु गांवकर याला समोर करून तालुक्यातील काही मंडळीना राजकारण करायचे होते. त्यासाठी रघु गांवकर याला पुढे करून खुलासे व निष्ठेच्या गोष्टी वदवून स्वतःचे मोठेपणा काहींना दाखवायचे होते. मात्र अश्या व्यक्तींचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत.

९० सालापासून शिरवंडे गाव हा राणे साहेबांसोबत एकनिष्ठ आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये शिरवंडे गावामध्ये राणे साहेब यांना मताधिक्य आहे. रघु गांवकर हे मूळ उबाठा सेनेचे. मात्र गेल्या ग्रामपंचायततीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश दिला. आम्हाला शिरवंडे गावातील ग्रामस्थांना रघु गांवकरला पक्षात घेण्यात विरोध होता. कारण त्याचा आम्हाला शिरवंडे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. रघु गांवकर नसतेवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकित शिरवंडे गावातून ६ वेळा ग्रामपंचायतीची बॉडी विरोधकांना एकही सदस्य न देता निवडणून आलेली आहे. त्यामुळे रघु गांवकर यांचा फायदा शून्य होता. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी मध्ये रघु गांवकर यांनी राणेसाहेबांच्या विरोधात विरोधी पक्षाचे काम केलेले आहे असेही काहींनी आम्हाला सांगितले.

अशी पार्श्वभूमी असताना रघु गांवकर निष्ठेचा खोटा दिखावा करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतं आहेत.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याची रघु गांवकर व वाडीतील लोकांनी विठ्ठल रखुमाई याचं नवीन मंदिर बांधकामाच्या संदर्भात मदतीसाठीच भेट घेतली होती. धार्मिक काम लक्षात घेता दत्ता सामंत यांनी त्या मंदिरासाठी असणारा सभागृह स्वःखर्चाने बाधून देतो असे सांगितले. अंदाजे त्या हॉलसाठी ४ ते ५ लाख रुपये खर्च आहे. दत्ता सामंत यांनी सुमारे ४ लाखाचे साहित्य त्या मंदिरासाठी पोच केले. हे दत्ता सामंत यांचे दातृत्व आहे. सामाजिक कार्यात मदत करणे ही राणे साहेबांची आम्हा सर्वाना असलेली शिकवण आहे. त्याच भावानेतून दत्ता सामंत आमदार निलेश राणे यांच्या सोबतीने जनसेवा करतं आहेत.
मंदिरासाठी दिलेली मदत ही धार्मिक भावानेतून आहे. या मंदिरासाठी आणखीही काही मदत लागल्यास मी ग्रामस्थ यांच्या सोबत आहे. ही भावना दत्ता सामंत यांची आहे. धार्मिक, आरोग्य विषयक मदत या विषयात दत्ता सामंत यांनी राजकारण कधी आणले नाही.

असे असताना रघु गांवकर व त्यांना बोलते करणाऱ्या तालुक्यातील पडद्यामागच्या काहीनी राजकारण करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढे तसें झाल्यास रघु गांवकर यांना जशास तस उत्तर दिले जाईल.

राणे साहेबांशी शिरवंडे गाव हा एकनिष्ठ राहिला आहे आणि पुढेही राहणार आहे. रघु गांवकर ज्या पक्षा मध्ये काम करत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्या आहेत. अशी भुमिका शिरवंडे शिवसेना शाखा प्रमुख संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी स्पष्ट केली आहे. तसेच आपण निष्ठावंत राणे समर्थक असल्याचेही संजय बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी सांगितले.

rapan bottom