Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मालवण तालुक्यातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टीदोष व वाचदोष तपासणी शिबिरांचे आयोजन

मालवण तालुक्यातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टीदोष व वाचदोष तपासणी शिबिरांचे आयोजन

मालवण : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) 2025’ अंतर्गत मालवण तालुक्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पंचायत समिती, शिक्षण विभाग, मालवण आणि RBSK ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय दृष्टीदोष आणि वाचदोष तपासणी शिबिराचे आयोजन मालवण येथे करण्यात आले होते.

​या शिबिराचा मुख्य उद्देश तालुक्यातील दृष्टीदोष किंवा वाचदोष असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देणे हा होता. या तपासणी शिबिरात RBSK च्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. तसेच, शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

​या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या तपासणीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी लवकर लक्षात आल्या आणि त्यांच्यासाठी विशेष शिक्षण पद्धतीची शिफारस करण्यात आली.

​राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये समावेशक शिक्षणावर (Inclusive Education) विशेष भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. अशा शिबिरामुळे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या यशस्वी उपक्रमाध्ये मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने, विषय तज्ज्ञ आरती कांबळी, गौरी नार्वेकर, विशेष तज्ज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच RBSK ग्रामीण रुग्णालय येथील बालाजी पाटील, डोळ्यांचे डॉक्टर, स्पीच थेरेपिस्ट पवार सर, ढोके मॅडम, कोमल मॅडम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom