याचं गतीमानतेला बळ देत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचीही खंभीर साथ
युवासेना कुडाळ मालवण माजी जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी व्यक्त केल्या भावना
मालवण : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे साहेब हे लोकसेवेचे उत्तम उदाहरण आहेत. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क, जनतेच्या अडचणींवर तात्काळ प्रतिसाद, आणि मतदारसंघात जलद गतीने विकासकामे राबवण्याची त्यांची कार्यशैली अत्यंत प्रेरणादायी आहे.
निलेश राणे साहेबांचे नेतृत्व हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नसून, त्यांनी विकासाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विश्वास मिळवला आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या गावांपर्यंत विकास पोहोचवण्याचे मोठे काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. रस्ते असोत, पाणी, आरोग्य, शाळा की शेतकऱ्यांचा प्रश्न – निर्णय लगेच आणि अंमलबजावणी ठोकताळ्यात!
आणि ह्याच झपाट्याच्या कामाला बळ देणारे, जनतेशी सातत्याने संवाद साधणारे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेब.
आमदार साहेब आणि जिल्हाप्रमुख जनतेसाठी लढणारे, कार्यकर्त्यांसाठी झगडणारे, आणि सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी अखंड झपाटलेले! असे हे नेतृत्व आहेत.
कुडाळ-मालवणचा विकास केवळ भाषणांमध्ये नाही, तर कृतीतून घडतोय – आणि त्यामागे आहे ही विकासपुरुष जोडी. कुडाळ-मालवण मतदारसंघाला असा आमदार लाभणे हे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
अश्या भावना युवासेना कुडाळ मालवण माजी जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.

जनतेसाठी गतिमानपणे काम करणारे नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे !
