Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

ट्रॅफिक समस्या लक्षात घेता रिक्षा रॅली होणार नाही

ट्रॅफिक समस्या लक्षात घेता रिक्षा रॅली होणार नाही

नारळी पौर्णिमा उत्सव निमित्त मालवण बंदर जेटीवर होणारे सर्व नियोजित कार्यक्रम होणार

पोलीस प्रशासन व पर्यटन महासंघ पदाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय

मालवण | प्रतिनिधी : ट्रॅफिक समस्या लक्षात घेता नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण बाजारपेठ मार्गांवर होणारी रिक्षा रॅली होणार नाही. नारळी पौर्णिमा उत्सव निमित्त बंदर जेटीवर होणारे सर्व नियोजित कार्यक्रम त्याच उत्साहात होणार. असा निर्णय पोलीस प्रशासन व पर्यटन महासंघ पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सोबत भाजपा मालवण मंडळ अध्यक्ष तथा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, दिक्षा गांवकर, रविंद्र खानविलकर, शेखर गाड, रामा चोपडेकर आदी उपस्थित होती.

पर्यटन महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात आयोजित होणाऱ्या रिक्षा रॅली बाबत मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मालवण येथील पर्यटन रिक्षा रॅली संदर्भात बैठक बोलावली. सदर रॅलीमुळे मालवण मध्ये नारळी पौर्णिमा उत्सवा दिवशी ट्राफिक समस्या उद्भवत असल्याने प्रतिकात्मक एक दोन रिक्षा घेऊन रॅली करावी व प्रशासनास सहकार्य करावे. अशी विनंती पोलीस निरीक्षक यांनी केली. त्यावर अन्य ठिकाणी निघणारी रिक्षा रॅली व आपल्याकडे रिक्षा पर्यटन पूरक सजावट करून रॅली त समावेश होतात त्यामुळे सहभागी रिक्षा पैकी एक दोन रिक्षा सहभाग करणे संयुक्तिक नसल्याने मालवण नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी इथे नागरिकांना उद्धवणाऱ्या ट्राफिक त्रासाचा विचार करून मालवण बंदर जेटी येणाऱ्या नागरिकांचा विचार करून रिक्षा रॅली रद्द करीत आहोत. परंतु रिक्षा व्यावसायिकाच्या सोबत आम्ही आहोत. त्याना पर्यटन पूरक सकारात्मक व्यवसाय वाढ होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी माहिती बाबा मोंडकर भाजपा मालवण मंडळ अध्यक्ष तथा अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ तसेच सहदेव साळगावकर अध्यक्ष तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांनी दिली.

rapan bottom