जुबेर खान | मालवण : मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा आजी माजी विद्यार्थी व आजी माजी विद्यार्थिनी अशा दोन गटात होणार आहे. यात दोन्ही गटातील विजेत्यांना प्रथम २००० रु., द्वितीय रु. १०००, तृतीय व चतुर्थ प्रत्येकी रु. ५०० अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून दिले जातील. नावनोंदणी दि. ६ ऑगस्ट पर्यंत करावी. अधिक माहितीसाठी हेमराज सावजी ८२७५६५०५१८, रेगन नहोना - ७२४९४०३३९०, सुदिप घाडी, वैभव माणगांवकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

