Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

कुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत झाली पाहणी

निलेश जोशी | कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत चार सदस्यीय समिती मार्फत मंगळवारी 'अ' वर्गातील कुडाळ बसस्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बस स्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छतेसह विविध व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली.
प्रादेशिक व्यवस्थापक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली पाहणीसाठी आलेल्या समितीमध्ये पुणे येथील एसटी महामंडळाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दादासो गावडे, पत्रकार काशिराम गायकवाड आणि प्रवासी मित्र सौरभ पाटकर यांचा समावेश होता. यावेळी सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय लेखाधिकारी शिंदे, कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानक प्रमुख पल्लवी मोर्ये, वाहतूक नियंत्रक महादेव आंबेस्कर, वरिष्ठ लिपिक (प्रशासन) रुपेश टेमकर आदी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांनी समितीचे स्वागत केले.
राज्य परिवहन महामंडळामार्फत संपूर्ण राज्यभरात स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवले जात आहे. हे अभियान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवले जात आहे. या अभियानांतर्गत राज्यातील एसटी बस स्थानकांची स्वच्छता, साफसफाई, स्वच्छतागृहे आणि कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करून त्यांना गुणांकन दिले जाते. त्यानुसार, कुडाळ आगाराच्या गांधीचौक येथील बसस्थानकातील विविध व्यवस्थापनाचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले.

rapan bottom