Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कर्तृत्ववान नेतृत्व..! | शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत वाढदिवस अभिष्टचिंतन…!

कर्तृत्ववान नेतृत्व..! | शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत वाढदिवस अभिष्टचिंतन…!

🖋️ कोकणभूमी ही नररत्नाची खाण म्हणून ओळखली जाते. अनेक रत्ने या मातीत तयार झाली, होत आहेत. त्यापैकीच एक उभरते नेतृत्व मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न पाणलोस गावचे सुपुत्र विनायक बाईत हे होय…!

यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त अश्या या व्यक्तीमत्वाने मालवणच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आपली यशस्वी मोहर अल्पावधितच उमटवली आहे. त्यांच्या कार्याची दखल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेत विनायक बाईत यांच्याकडे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. वरिष्ठानी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असताना शिवसेनेच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या समीकरणानुसार विनायक बाईत तन, मन आणि धन अर्पण करून कार्यरत आहेत. मठबुद्रुक गावात ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, आडवली मालडी जिप मतदारसंघ शिवसेना संपर्कप्रमुख ते शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हा विनायक बाईत यांचा उंचावत जाणारा राजकीय प्रवास आदर्शवत असाच राहिला आहे. अश्या या कर्तृत्ववान नेतृत्वाचा आज वाढदिवस..! विनायक बाईत आपण दीर्घायुषी व्हा. आपल्या हातून जनसेवा घडत राहो. आपणास उदंड आयुष्य लाभो ही श्री देव रामेश्वर चरणी प्रार्थना…!

परिचय

विनायक शिवराम बाईत…जन्म स्थळ पाणलोस… विवेकानंद कॉलेज कोल्हापुर येथे शिक्षण पुर्ण केले. याचं दरम्यान वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून वडील शिवराम साबाजी बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले. व्यवसाय क्षेत्रात खंबीरता निर्माण केली. माणसे जोडली. गावातील मित्रपरिवार यांना सोबत घेऊन व्यवसायाचे जाळे निर्माण केले.
अल्पावधीतच एक यशस्वी उदघोजक म्हणुन विनायक बाईत यांनी नावलौकिक प्राप्त केला. व्यवसाय उद्योग सांभाळत असताना सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा सहभाग राहिला. त्यांच्या कार्याला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला सलग दहा वर्ष पाणलोस वार्ड सदस्य म्हणुन ते भरघोष मतांनी विजयी झाले. मठबुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून सेवाकार्य करत गेली दहा वर्षे जनतेला अपेक्षित असा कारभार पारदर्शकपणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करतं आहेत.

अग्रेसर कामगीरी

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून मठबुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली. अनेक ठिकाणी स्वखर्चातून विकास कामांना प्राधान्य दिले. शैक्षिणिक सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रात अग्रेसर कामगीरी करून मठबुद्रुक गावचा नावलौकिक करण्यात विनायक बाईत यांचेही कार्य महत्वपुर्ण राहिले.

नवे नेतृत्व उदयास

प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा गुरुही त्याच तोलामोलाचा असतो. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे मार्गदर्शक गुरु म्हणून विनायक बाईत यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनात आचरा, मसुरे, आडवली मालडी मतदारसंघात नवे नेतृत्व उदयास आले. सामाजिक कार्यात विनायक बाईत अग्रेसरपणे कार्यरत आहेत. अनेक गरजुंना मदतीचा त्यांचा नेहमीच आहे. शालेय विध्यार्थांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे, आरोग्य सेवा उपलब्ध करणे, कोरोना काळात तर आडवली मालडी विभागात मदत कार्य औषधसाठा स्वखर्चातून त्यांनी अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिला. अनेक मंदिरातील धार्मिक कार्यातही त्यांचा सहभाग सातत्याने राहिला. स्पर्धक खेळाडू यांना प्रोत्साहन देत त्यांनाही प्रसंगी मदत करतं क्रीडा क्षेत्रातही विनायक बाईत यांचे योगदान नेहमीच राहिले.

आगामी काळातही आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात समाजसेवेला सर्वाधिक प्राधान्य देत असताना शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नाशील आणि कार्यरत असल्याचे विनायक बाईत यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.

▪️शब्दांकन : अमित खोत | मालवण

▪️संकलन : शानू वालावलकर | मालवण

rapan bottom