संताजी माळगावकर द्वितीय, मयूर आपकर तृतीय क्रमांकाचे मानकरी
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

मालवण : चिंदर येथील माय माऊली ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेत गंधार कांबळी याने प्रथम क्रमांक मिळवला तर संताजी माळगावकर व मयूर आपकर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी उपसरपंच महेंद्र मांजरेकर, भाजपचे तालुका चिटणीस दीपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, बारापाच मानकरी दिनेश पाताडे, संतोष गावकर, दिगंबर जाधव, छोटू साटम, शेखर पाताडे, संतोष अपराज, अमित पवार, सागर अपराज, रवी घागरे, संजय लोके, मिथुन चिंदरकर, सिद्धेश नाटेकर, धनंजय नाटेकर, विघ्नेश भरतू, सोहम चिंदरकर यांच्यासह मायमाऊली ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

