Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

विनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर

विनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर

बंदुका घेतलेल्यांचीही झाली चौकशी

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील मोरे येथील बंदुका बनवण्याच्या कारखान्यात अजून किती बंदुका तयार करण्यात आल्या, कोणाला देण्यात आल्या व यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास कुडाळ पोलीस कसोशीने करीत आहेत. उद्या अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारी पाच संशयित आरोपींना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आज कुडाळ पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत असून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बंदुका कोणाकोणाला वितरित करण्यात आल्या याची माहिती पोलीस घेत आहेत.
माणगाव खोऱ्यातील मोरे येथे एका फॅब्रिकेशनच्या सेंटर मध्ये बंदुका बनविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून बंदुकांसह काही लोकांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पूर्ण माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
   याप्रकरणी पोलिसांनी शांताराम दत्ताराम पांचाळ (४२,मोरे मधली वाडी,या.कुडाळ), आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (३२,रा. माणगांव,या.कुडाळ), यशवंत राजाराम देसाई (५८ वाणेगल्ली, आजरा, जि..कोल्हापुर), प्रकाश राजाराम गुरव (वय ४०, रा.आजरा, जि.कल्हापुर) व सागर लक्ष्मण घाडी (मालवण नांदरुख) या पाच जणांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले होते. कुडाळ न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्ट पर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती.
आज पाचही संशयित आरोपीकडे
पोलीसांनी चौकशी केली. ज्यांना बंदुका दिल्यात त्यांची नांवे सांगितल्यावर अशा लोकांना पोलीसांनी बंदुका घेऊन चौकशीला बोलविले होते. त्यांच्या कडे चौकशी करण्यात येत होती. सकाळ पासून लोकांची कुडाळ पोलीस ठाण्यात वर्दळ दिसत होती. तेव्हा का बंदुक घेतलेलात, काय नवीन, अशी विचारणा मित्र मंडळी एकमेंकांना करताना दिसून येत होती.
याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिरूद्ध सावर्डे करीत आहेत.

rapan bottom