Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना अभिप्रेत शिवसेना संघटना गावागावात निर्माण करणार !

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना अभिप्रेत शिवसेना संघटना गावागावात निर्माण करणार !

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी व्यक्त केला विश्वास ; श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थ्यांसोबत बैठक

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना अभिप्रेत असलेली शिवसेना संघटना गावागावात निर्माण करणार. असा विश्वास शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी श्रावण गवळीवाडी येथे व्यक्त केला.

दरम्यान, श्रावण येथील शिवसेना पक्षाची कार्यकरणी दोन दिवसात जाहीर केली जाईल. असे तालुका प्रमुख प्रमुख विनायक बाईत यांनी यावेळी सांगितले.श्रावण गवळीवाडी मध्ये शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी भेट दिली. ग्रामस्थ्यांसोबत बैठक घेत विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रामुख्याने या भागात मोबाईल नेटवर्क सेवा तसेच इंटरनेट सेवा नसल्यामुळे संपर्क करणे यात अडचणी येतात. नेटवर्क, इंटरनेट अभावी शालेय विद्यार्थ्यांनाही समस्या निर्मण होतात. 3 कि.मी अंतरावर पायपिट करत रेंज शोधावी लागते. या समस्या सोडवा. अशी एक मुखी मागणी युवा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी केली. विनायक बाईत म्हणाले इंटरनेट त्वरित उपलब्धतेसाठी स्वखर्चाने काही उपाययोजना शक्य असल्यास त्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. श्रावण गवळीवाडी एकमुखाने शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे असल्याचे सांगितले यावेळी उपस्थितानी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत, मंगेश यादव, प्रशांत परब, स्वप्निल दळवी, उमेश घाडीगांवकर, बाळा वेंगुर्लेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय गवळी, गणपत पाटकर, भारमलं सडेकर, सावंत, नारायण बगाड, गवळीवाडीचे गावकर बबन सावंत, माजी उपसरपंच प्रमोद गवळी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

▪ अमित खोत, मालवण

rapan bottom