Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

'त्या' चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत

'त्या' चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत

मालवणातील सकल हिंदू समाजाने वेधले प्रशासनाचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : 'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटाचा 'ट्रेलर' पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवली असल्याचे स्पष्ट होते. ट्रेलरमधेच जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, तर संपूर्ण चित्रपटात आणखीन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या, विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे समाजात विशषेतः विद्यार्थी आणि तरुणपिढी यांमध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत, तसे न झाल्यास चित्रपट प्रदर्शीत होऊ देऊ नये, अशी आक्रमक भुमिका मालवण येथील सकल हिंदु समाजाने स्पष्ट केली.

मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करत शासनाकडे निवेदन पाठववून आमची मागणी त्वरित पोहच करावी अशी भुमिका मांडली आहे.

श्री शिवशंभू विचार मंच, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवराज मंच, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सनातन संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसह हिंदू बांधवांतर्फे मालवणचे नायब तहसीलदार विनायक जांभेकर व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी अजित आचरेकर, भाऊ सामंत, ऍड. समीर गवाणकर, ऍड. हेमेंद्र गोवेकर अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, समीर शिंदे, सौ. शिल्पा खोत, भाई मांजरेकर, प्रसाद भोजने, यशवंत सतजोशी, मंदार सरजोशी, सौ. सेजल परब, सन्मेष परब, ऐश्वर्य मांजरेकर, शांती तोंडवळकर, राजाराम हळदणकर, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, प्रवीण पारकर, विवेक परब, उमेश परुळेकर, कुणाल आंगणे, चिंतामणी सामंत, गणेश मेस्त्री, हरेश पडते आदी व इतर उपस्थित होते.

खालिद का शिवाजी या चित्रपटाचे ट्रेलर बघितल्यानंतर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या रीतीने मोडून तोडून दाखविलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५% मुसलमान होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर एक मशीद बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये ११ मुसलमान होते, असे दावे या चित्रपटात केले गेले आहेत. हे दावे कोणत्याही इतिहासकारांकडून तपासून घेतलेले नाहीत किंवा या गोष्टी कोणत्याही समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये प्रमाण स्वरूपात आढळत नाहीत. या असत्य गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती समाजात पसरवली जात आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहचवणारी आहे. यामुळे समाजात तसेच इतिहासकारांमध्ये भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

ही जी काही विकृत स्वरूपाची माध्यमे आहेत जी अशा प्रकारच्या गोष्टी समाजात पसरविण्यामध्ये कुप्रसिद्ध आहेत आणि ही गोष्ट अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक आहे. त्यामुळे समकालीन ऐतिहासिक पुरावे व कागदपत्रे तपासून या चित्रपटाची समीक्षा केली जावी, सत्यता तपासली जावी. यामधील सर्व असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत आणि भविष्यात जर यापुढे कोणी अशा प्रकारच्या गोष्टी करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर तत्काळ बंदी घातली जावी. अशा प्रकारच्या गोष्टीमुळे मालवण सारख्या ऐतिहासिक शहरात वाद तसेच कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे म्हणून ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

rapan bottom