Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

शिवसेना | आचरा विभागातील शाळांमध्ये वह्या वाटप

शिवसेना | आचरा विभागातील शाळांमध्ये वह्या वाटप

आचरा : शिवसेना पक्षाच्या वतीने आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वह्या वितरण करण्यात येत असून याचा शुभारंभ चिंदर भटवाडी जिल्हा परिषद शाळा, सडेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला.

आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जि. प. शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वाह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी चिंदर येथील शाळांमध्ये आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, राजु वराडकर, मैना कारंडे, दिपा गोसावी, विजय पाटील, शैलेश गोलतकर आदी उपस्थित होते. भटवाडी शाळा मुख्याध्यापक सौ. निशिगंधा वझे, सडेवाडी शाळेच्या शिक्षिका सौ. शुभांगी खोत-लोकरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

आचरा भागातील प्राथमिक शाळांना शिवसेनेतर्फे वह्यावाटप

आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील आचरा भागातील प्राथमिक शाळांनाही वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख मुज्जफर मुजावर, आचरा शाखा प्रमुख अभिजित सावंत, बाबू कदम, सचिन सारंग, श्रीकांत पराडकर, दर्शन तारी उपस्थित होते. आचरा भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्याने पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

rapan bottom