Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

ग्रामीण भागातील रस्ते सुधारा ; मनसेची मागणी

ग्रामीण भागातील रस्ते सुधारा ; मनसेची मागणी

मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाची घेतली भेट

निधी नसल्याची अधिकाऱ्यांची खंत

निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY, CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा केली. ग्रामीण भागातील रस्ते सुधारा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी निधी नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्याबद्दल मनसे शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज, उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, सुबोध परब, विद्यार्थी सेना अध्यक्ष यतिन माजगावकर, हेदुळ शाखाध्यक्ष सुरज पुजारे, अनिकेत ठाकूर उपस्थित होते.
प्रामुख्याने कविलगाव साई मंदिर रेल्वे स्टेशन रोड गणपती पुर्वी खड्डे बुजवणे आणि केरवडे तर्फ माणगाव नविन रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोऱ्या खचणे व खड्डे पडले आहेत तर काही रस्त्याची दुर्दशा झाली आहे. असे बरेच रस्ते ग्रामसडक योजनेच्या नविन प्रोग्रामच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना फार मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर काम झालेल्या काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि ते ठेकेदाराच्या जोखीम कालावधीत आहेत. त्यांचे खड्डे भरण्यात यावे ज्या कामांचे कार्यारंभ आदेश झालेत ती काम लवकरात लवकर पुर्ण करावीत, स्थानिक ठेकेदार सिंडीकेट चेन करुन ठेके भरत नसतील तर बाहेरील ठेकेदारांना संधी द्यावी.
नविन प्रोग्राम व निधी साठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा, पत्रव्यवहार करावेत. अशा अनेक विषयांची चर्चा यावेळेस करण्यात आली व निवेदन देण्यात आले.

rapan bottom