मालवण : भाजपा मालवण उपाध्यक्ष पदी युवा उद्योजक केदार झाड यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा व महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.
दरम्यान भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केदार झाड यांचे मालवण भाजपा कार्यालय येथे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपा पदाधिकारी, पर्यटन व्यावसायिक महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.
केदार झाड यांनी यापूर्वी भाजपा कार्यकर्ता म्हणून राजकीय सुरवात केली. त्यांनंतर वायरी शक्तीकेंद्र प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामाची पोचपावती म्ह्णून पक्षाने त्यांना तालुका उपाध्यक्ष पदी बढती दिली आहे.

