Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन

पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड ) यांचे शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ८० वर्षे होते.
पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा श्री गणेश मृदुंग वादन क्लासचे संचालक, मार्गदर्शक, सुप्रसिद्ध - मृदुंगमणी,पखवाज वादक मोहन मेस्त्री यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना,दोन मुली, नातवंडे, तीन भाऊ वहिनी, पुतणे, असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही प्रसंगी अडीअडचणीला धावून जाण्यामध्ये त्यांचा पुढाकार असायचा गणपती समोरच्या आरत्या, भजन गायन यामध्ये त्यांना फार आवड होती.. श्रावण महिन्यामध्ये विविध ग्रंथांची पारायणे ते आवर्जून करीत असत. शरीरातील हाडांचे दोन तुकडे झाले तरी सुद्धा ते सापळी बांधून हाडसांदण्याचं गावठी औषध देऊन रुग्णांना बरे करायचे. मणक्यातील गॅप सुद्धा ते गावठी औषधाने भरून काढायचे. सिंधुदुर्गातच नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर सुद्धा अनेक हजारो रुग्ण त्यांनी अतिशय कमी खर्चात बरे केलेले आहेत.

rapan bottom