Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ युवासेना पदाधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

कुडाळ युवासेना पदाधिकाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उपजिल्हाप्रमुख पदी स्वरूप वाळके

कुडाळ तालुका प्रमुखपदी सागर वालावलकर, अच्युत उर्फ अनिकेत तेंडुलकर

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची माहिती

कुडाळ : सिंधुदुर्ग युवासेना कुडाळ येथील उपजिल्हा प्रमुख व तालुकाप्रमुख नियुक्त्या युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी जाहीर केल्या आहेत. सिंधुदुर्ग युवासेना कुडाळ मालवण उपजिल्हाप्रमुख पदी स्वरूप वाळके, युवासेना कुडाळ तालुका प्रमुखपदी सागर हेमचंद्र वालावलकर यांना फेरनियुक्ती तर अच्युत उर्फ अनिकेत राजेंद्र तेंडुलकर यांचीही तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागर वालावलकर यांच्याकडे जिप विभाग तेंडोली, नेरूर, आंब्रड, ओरोस तसेच कुडाळ शहर ही जबाबदारी असणार आहे. तर अच्युत तेंडुलकर यांच्याकडे जिप विभाग माणगांव, घावनळे, वे. बांबार्डे, पिंगुळी, पावशी ही जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तीनही पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत अभिनंदन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ तालुकाप्रमुख दिपक नारकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवासेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी दिली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा ! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom