कुडाळ : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेना जिल्हा सहसचिव पदी मालवण येथील कविता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी कविता मोंडकर यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, संजय पडते, वर्षा कुडाळकर, दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार तसेच आमदार निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शिवसेना पक्षाच्या "महिलासेना जिल्हा सहसचिव (कुडाळ, मालवण) पदी नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
▪️ अमित खोत | मालवण

