Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास अटक

इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास अटक

कुडाळ पोलिसांची कामगिरी

संशयितास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

निलेश जोशी | कुडाळ : महिलेचे बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी संजय कृष्णा जाधव (वय वर्ष 25 रा. कारिवडे जाधववाडी ता. सावंतवाडी) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचे अज्ञात आरोपीत याने बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्राम वर प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी त्याचे विरुद्ध कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दिनांक 26 जुलै 2025 रोजी दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करत होते. गुन्ह्याच्या तपासात हा गुन्हा संजय कृष्णा जाधव वय वर्ष 25 रा. कारिवडे जाधववाडी ता. सावंतवाडी यांने केल्याबाबत पुरावा मिळून आला. त्यामुळे त्यास या गुन्ह्याच्या कामी दि 01 ऑगस्ट 2025 रोजी अटक करून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीने गुन्हा करण्याकरता वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या संशियत आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर आणि प्रमोद काळसेकर यांनी काम पहिले.

rapan bottom