Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

गांजा बाळगल्याप्रकरणी मालवण पोलीसांनी अटक केलेल्या संशयितांना सशर्त जामीन मंजूर

गांजा बाळगल्याप्रकरणी मालवण पोलीसांनी अटक केलेल्या संशयितांना सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले

मालवण : वराड-कुसरवे येथे अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी संशयीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी दि. 31/07/2025 रोजी वराड-कुसरवे येथे केलेल्या कारवाईत 262 ग्रॅम गांजासहीत संदीप विनायक परब वय 41 वर्ष राह. वराड मालवण, अविरत गणेश ढवण वय 31 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, हेमंत अनिल भोगल वय 24 वर्ष राह. हरकुळ ता. कणकवली, आकाश शिवाजी निकम वय 24 वर्ष राह. कणकवली या संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चारही संशयितांना मालवण पोलीसांनी अटक केली. संशयितांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या. त्याप्रमाणे प्राथमिक तपासकाम करून पोलिसांनी संशयितांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता मालवण पोलिसानी सर्व संशयितांची 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली. संशयितांतर्फे केलेल्या युक्तीवादानुसार मालवण पोलिसांनी रिकव्हरी पूर्ण झाली असल्याने व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून संशयीताना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर संशयीतांतर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आले. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. 15,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

rapan bottom