Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी बदल

मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी बदल

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी

युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण अजगणी कणकवली या सायंकाळी सुटणाऱ्या बस फेरीत शालेय मुलांच्या सोईसाठी १५ मिनिटे बदल करण्यात आला आहे. मालवण आगारातून ४.३० वा. सुटणारी बसफेरी ४.४५ वा. सुटणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागला आहे. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

पालक ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार युवासेना जिल्हप्रमुख संग्राम साळसकर यांच्या नेतृत्वात महान सरपंच अक्षय तावडे, राजेंद्र धुरी, किशोर पवार, सूर्यकांत कदम, प्रवीण चव्हाण यांनी मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना निवेदन दिले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधले.

दिलेल्या निवेदनात म्हटले होते,मालवण आगार येथून संध्याकाळी मालवण अजगणी कणकवली ही फेरी संध्याकाळी ४.३० वाजता मालवण येथून कणकवली जाण्यास निघते. शालेय मुलांची शाळा सुटण्याची वेळ व गाडी सुटण्याची वेळ काहीशी आधी असल्याने मुलांना शाळेतून घरी जाताना सदर गाडी चुकते. सदर गाडी गेल्यानंतर संध्याकाळी उशिराने ६.३० ला दुसरी गाडी आहे. तोपर्यंत मुलांना गाडीची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तरी मालवण वरून ४.३० ला सुटणारी अजगनी -कणकवली फेरीची वेळ बदलून संध्याकाळी ४.४५ करण्यात यावी. जेणेकरून मुलांना घरी लवकर जात येईल. वरील विषयावर प्राधान्याने कार्यवाही करणेत यावी जेणेकरून मुलांना होणार त्रास दूर होईल. असे निवेदनात म्हटले होते. दरम्यान गाडीच्या वेळेत सोमवार 4 ऑगस्ट पासून बदल करण्यात येणार आहे. असे मालवण आगारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom