मालवण : आपल्या थोर कोकणी भजन परंपरेतील अविभाज्य घटक भारुड लोप पावत असले बाबत विविध मान्यवर भजनी कलाकारांनी खंत व्यक्त केली आणि म्हणूनच श्री. भालचंद्र केळुस्कर बुवा यांच्या मार्गदर्शनात श्री स्वयंभू देव भुतनाथ देवस्थान, वायरी भूतनाथ मालवण यांच्यावतीने गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातला पहिलाच उपक्रम भारुडासहित भजन स्पर्धा आयोजित केली जात आहे.

ही स्पर्धा सातत्याने व्हायला पाहिजे तर स्पर्धक संख्या वाढली पाहिजे. आपली भजन परंपरा टिकवण्यासाठी पहिल्यांदाच उत्तम उदात्त हेतूने उचललेले पाऊले यशस्वी होण्यासाठी सर्व भजनी महर्षींना, ज्येष्ठ बुवांना, गुरवर्य यांना माझी विनंती आहे आपल्या शिष्यांना या भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे जेणेकरून भारुडाची परंपरा यापुढे अबाधित राहील. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भगवान लुडबे यांनी भूतनाथ मंदिर येथे आयोजित भारुडासहित भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर उपसरपंच प्राची माणगावकर, देवानंद लोके भालचंद्र देऊलकर, श्रीकृष्ण तळवडेकर, दादा झाड, सुभाष पाटकर, परीक्षक रुपेंद्र परब, सुरज परब, जय भूतनाथ प्रतिष्ठानचे गजानन बोडवे, दिगंबर देऊळकर, तंटामुक्ती अध्यक्ष अरूण तळगावकर
मेघश्याम लुडबे, देविदास चव्हाण, श्री स्वयंभू देव देवस्थान चे कार्यकर्ते गजानन बोडवे, मंदार बोडवे, किरण बोडवे, महादेव मालवणकर, महेश तळवडेकर, सहदेव बोडवे, साहिल बोडवे, बंटी बोडवे, चैतन्य बोडवे, वैभव मसुरकर, अक्षय देऊळकर, तन्मय तळवडेकर, आयुष मालवणकर, दुर्वेश बोडवे, साईश बोडवे, ग्रामस्थ दीपक देऊळकर, नंदू झाड, रवी मसुरकर, मंगेश झाड, महादेव चव्हाण, दिगंबर देऊळकर, अशोक मुंबरकर, बबन गावकर, कार्यक्रमाचे निवेदन अक्षय सातार्डेकर यांनी केले तर आभार गजानन बोडवे यांनी मांडले.


