Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

कुडाळ न.प.चा अडकलेला निधी वितरित

कुडाळ न.प.चा अडकलेला निधी वितरित

आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा पाठपुरावा

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी शासन दरबारी अडकला होता हा निधी प्राप्त व्हावा म्हणून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीला प्रलंबित असलेल्या निधी पैकी १ कोटी १० लाख एवढा निधी तात्काळ वितरित करण्यात आला आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, कुडाळ नगरपंचायतीला सन २०२१- २२ मध्ये नगर विकास विभागाकडून नवीन नगरपंचायतींना सहाय्य अनुदान अंतर्गत चार कामांना रुपये २ कोटी तसेच पाच कामांना २ .०५ कोटी असा निधी मंजूर झाला होता मागील तीन वर्षात प्रत्येकी रुपये ९.५० लाख व रुपये १८.५० लाख असे एकूण रुपये २८ लाख शासनाकडून वितरण झाले होते. उर्वरित निधी मंजूर असून सुद्धा वितरित करण्यात आला नव्हता. या संदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर याचा आढावा घेतला आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे १७ फेब्रुवारी रोजी पत्र सादर करण्यात आले होते. या पाठपुराव्याला आता यश आले आहे .आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित असलेला रुपये १ कोटी १० लाख एवढा निधी नगर विकास मंत्रालयाकडून कुडाळ नगरपंचायतीला वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी मागणी प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केला जाणार आहे. या वितरित निधीमधून प्रामुख्याने भंगसाळ येथील गणेश घाट सुशोभीकरण, जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मुख्य गटार व दिवाबत्ती व अन्य विकास कामे पूर्णत्वास येणार आहेत. एकंदरीत मागील दोन वर्ष ठप्प असलेल्या विकास कामाला वेग मिळणार असून कुडाळ नगरपंचायतीच्या महत्त्वकांक्षी विकास कामे मार्गी लागणार आहेत. असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.

rapan bottom