Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

वालावल येथील अवैध वाळू उपशावर महसुलची कारवाई

वालावल येथील अवैध वाळू उपशावर महसुलची कारवाई

धडक कारवाईत सहा रॅम्प उध्वस्त

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत (बेकायदेशीर) वाळू उपशावर शुक्रवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत सहा रॅम्प उध्वस्त करण्यात आले. कुडाळ महसुली विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कुडाळ तालुक्यातील वालावल येथील वाळू पट्ट्यात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसुल यंत्रणेला मिळाली होती. यांची दखल घेत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वतः वालावल येथील वाळू पट्ट्यात आपल्या यंत्रणेसह शुक्रवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास धडक देत कारवाई केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, तलाठी श्रीमती मयेकर, पोलिस पाटील यांच्या पथकाने वालावल येथील कर्ली नदी किनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.
सध्या शासनाने वाळू उपशाला बंदी घातली असतानाही, जुलै महिन्यात कर्ली नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी सहा अनधिकृत रॅम्प तयार केले होते.ते सर्व रॅम्प उध्वस्त करण्यात आले.या कारवाई मुळे या भागातील अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

rapan bottom