
परुळे : परूळे आंबेगाळी ग्रामस्थांचे एक स्नेहसंमेलन काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग भवन मुंबई येथे संपन्न झाले. ग्रामस्थांच्या या
स्नेहसंमेलनसाठी आमदार निलेश राणे यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून बहुमोल सहकार्य केले.

परूळे आंबेगाळी ग्रामस्थांनी नुकतीच आमदार निलेश राणे यांची मुंबई येथील ऑफिस मध्ये भेट घेत आभार व्यक्त करतं त्यांचा सत्कार केला. आमदार निलेश राणे यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधतं आपण नेहमीच सोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.

