Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

अनधिकृत दुचाकी व्यवसायिकांवर कारवाई करा…

अनधिकृत दुचाकी व्यवसायिकांवर कारवाई करा…

पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई न केल्यास उपोषण आंदोलन ; मालवणातील रिक्षा व्यवसायिकांचा इशारा

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात तसेच परिसरात पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या अनधिकृत दुचाकींमुळे अधिकृत रिक्षाव्यवसायिकांचा व्यवसाय डबघााईस आला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष द्यावे. त्यांना अधिकृत परवाने तरी द्यावेत किंवा कडक कारवाई करावी. याबाबत दखल न घेतल्यास आम्ही रिक्षा व्यवसायिक तीव्र आंदोलन उभारू असा इशारा रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पप्या कद्रेकर यांनी दिला.
शहरातील तसेच पंचक्रोशीतील अधिकृत रिक्षा व्यवसायिकांनी आज सायंकाळी भरड दत्त मंदिर येथे अनधिकृत दुचाकी व्यवसायाबद्दल बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी निलेश लुडबे, राजा मांजरेकर, विठू वराडकर, जगदीश सातार्डेकर, गोविंद गावकर, जयेंद्र सावजी, राजू किर, विश्वनाथ नाटेकर, प्रमोद मराळ, रामचंद्र पराडकर, साई आंबेरकर, वरद धुरी यांच्यासह परिसरातील रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

कद्रेकर म्हणाले, मालवण हे पर्यटन शहर असल्याने लाखो पर्यटक शहर, परिसरास भेटी देतात. यात वास्तव्यास असणाऱ्या पर्यटकांना शहर परिसरात अनधिकृतरित्या दुचाकी प्रवासासाठी दिल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात पर्यटकांना दुचाकी देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अनधिकृत दुचाकींमुळे अधिकृत रिक्षा व्यावसायिकांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. अनधिकृत दुचाकींवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली होती. यात काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने पर्यटकांना दुचाकी देणाऱ्यांचे प्रमाण सद्यस्थितीत वाढले आहे.
शहर परिसरातील अधिकृत रिक्षा व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून रिक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे व्यवसायच न झाल्यास बँकांचे हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न रिक्षा व्यावसायिकांना भेडसावत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन रिक्षा हाच एकमेव व्यवसाय आहे. काही रिक्षा व्यावसायिकांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अनेक रिक्षा व्यावसायिकांच्या उदारनिर्वाहावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करत एकतर दुचाकी व्यवसाय करणाऱ्यांना अधिकृत परवाने द्यावेत किंवा त्यांच्यावर कडक कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. याची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास आम्हा रिक्षा व्यावसायिकांना तीव्र आंदोलन, उपोषण छेडावे लागेल असा इशाराही श्री. कद्रेकर यांनी यावेळी दिला.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom