संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील मसदे श्री स्वामी मर्थ मठ येथे प. पु. गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट येथे सोमवार ११ ऑगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता सामूहिक सत्यनारायण महापूजा, ११ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता गावडे काका महाराज यांचे आगमन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन, १ वाजता महाप्रसाद-अन्नदान, २.३० वाजता श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा ओंकार येरम यांचे भजन, सायंकाळी ५ वाजता भजने, ७ वाजता दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवेकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९४२३५३८४१८ यांच्याशी संपर्क साधावा.

मसदे येथील स्वामी समर्थ मठात ११ ऑगस्टला विविध कार्यक्रम!
