पोईप येथील घटना...
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप सोनजीवाडी येथील रहिवासी आणि प्रसिद्ध मेस्त्री काम करणारे गणपत ( आप्पा ) रघुनाथ मेस्त्री यांच्या घरालगत असलेला कोंबड्यांच्या घुडात आलेल्या सुमारे पाच फुटी अजगला सर्पमित्र रमण पेडणेकर सतिश मसुरकर यांनी अथक परिश्रमातून सुरक्षित रित्या पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून जिवदान दिले आहे.
गणपत मेस्त्री यांना आपल्या घरालगत असलेला घुडात कोंबड्यांचा जोरजोरात आवाज येत होता म्हणून पाहण्यासाठी गेले असता मेस्त्री यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत सर्पमित्र रमण पेडणेकर सतिश मसुरकर यांना कळवलेअसता यांनी तेथे येवून पाहिले असता तो भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास आले अजगरने दोन कोंबड्या हि गिळल्या होत्या रमण पेडणेकर सतिश मसुरकर यांनी सुरक्षित रित्या त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. यासाठी सोनजीवाडीतील व वरची माधववाडीच्या तरूणाचे त्यांना सहकार्य लाभले.

