मुंबई : वीज ग्राहकांना भाजपा-महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या एकूण ७०% ग्राहकांसाठी वीज दरात २६% कपात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा २४/७ विचार करणारे हे सरकार आहे. म्हणूनच राज्याची विकासाकडे वेगानं वाटचाल सुरू आहे. यापुढेही २५ वर्ष वीज दर स्थिर राहणार आहेत. हे केवळ भाजपा महायुती सरकारमुळे शक्य आहे. अश्या भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

महायुती सरकारचा 'महा'निर्णय | जनतेला 'महा'दिलासा
