मालवण | प्रतिनिधी : मालवण भाजपा कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची ३०० वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.
अश्या ह्या थोर राजमाता अहिल्यादेवी यांची ३०० वि जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सिंधुदुर्ग बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, शहर सरचिटणीस पंकज सादये, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, युवामोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, राजू आंबेरकर, नमिता गावकर, मिलिंद झाड, दिलीप सांगवेकर यांसह भाजपा कार्यकतें उपस्थित होते.

मालवण भाजपा कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
