Monday, 02 November 2026
Latest News
तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात!
ruchira top

आमदार निलेश राणे यांना 'दशावताराचा कैवारी' उपाधी

आमदार निलेश राणे यांना 'दशावताराचा कैवारी' उपाधी

पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या सभेत गौरव

निलेश जोशी | कुडाळ: श्री गिरोबा देवस्थान बिबवणे येथे पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्ग यांची सभा आज (शुक्रवारी) पार पडली. या सभेला सिंधुदुर्ग कार्यकारिणीतील सदस्य. तथा प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष तसेच प्रतिनिधी असे एकूण 30 जण उपस्थित होते. अनेक वर्ष लढा देऊन नेहमी अपयशाशी झुंज देणाऱ्या दशावतार कलाकारांची यशाच्या मार्गाकडे वाटचाल करुन देणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा यावेळी दशावतारांचा कैवारी ही उपाधी देऊन गौरव करण्यात आला.


सर्वप्रथम आमदार निलेश राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व संस्कृतिक मंत्रालय अधिकारी यांच्याशी दशावतार कलाकार संघाची सभा घडवून दशावतार कलाकार नोंदणी तसेच अंगावरील पोशाख व अनेक समस्यांबाबत वाचा फोडत सिंधुदुर्गातील तमाम दशावतार कलाकारांचा पायलट प्रोजेक्ट तयार करून घेत न्याय दिल्याबद्दल दशावतारचा कैवारी ठरलेले आ. निलेश राणे तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्रालय अधिकारी, सदैव दशावतार कलाकार यांच्या पाठीशी असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, दादा साईल देवेन सामंत, दत्तप्रसाद धुरी (मुंबई) तसेच या सर्वांना पेटाऱ्यातील गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो, असे म्हणत आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.
संस्कृतिक मंत्री शेलार यांच्या आदेशानुसार दशावतार शिफारस समितीवर या संघांचे 2 कलाकार सदस्य तसेच सिंधुदुर्गातील सर्व दशावतार कलाकारांची नाव नोंदणी तसेच कलाकारांच्या पोशाखासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी अ, ब, क, ड, या वर्गानुसार कलाकार नोंदणी करण्यासाठी नियोजन बैठक झाली. आपल्या प्रत्येक तालुका संघाच्या अध्यक्षाकडे नाव नोंदणी करून अनेक वर्ष लढत असलेल्या न्याय हक्काचा पाया मजबूत करावा असे आवाहन सिंधुदुर्ग दशावतार कलाकार संघांचे अध्यक्ष पुरुषोत्तम (बाळू) कोचरेकर यांनी यावेळी सिंधुदुर्गातील समस्त दशावतार कलाकारांना केले. तसेच सर्व कलाकारांनी एकजुटीने एकत्र यावे असे आवाहन करत संघातील उपस्थित कार्यकारिणी सदस्य तसेच प्रत्येक तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच बिबवणे गावचे ग्रामस्थ आबा राऊळ यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

https://youtu.be/6or_mI8r6S8

rapan bottom